शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय तरुणांना लुटले

By admin | Updated: June 18, 2014 01:36 IST

औरंगाबाद : गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठविण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून तिघा जणांनी त्यांच्या खिशातील ५२ हजार रुपये लुटले.

औरंगाबाद : गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठविण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून तिघा जणांनी त्यांच्या खिशातील ५२ हजार रुपये लुटले. ही घटना मंगळवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनजवळ क्रांतीचौक रोडवर घडली. ब्रिजेश रामब्रीश यादव (२४, ह. मु. लासूर स्टेशन, रा. बिहार) व रामकृपाल यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे दोघेजण सद्गुरू साई एज्युकेशन संस्थेत लासूर स्टेशन, डोणगाव येथे नोकरी करतात. ब्रिजेश व रामकृपाल हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून येथे सोबत एकाच रूममध्ये राहतात. त्यांना गावी आई-वडिलांना पैसे पाठवायचे होते. त्यासाठी दोघेही लासूर स्टेशन येथून आज मंगळवारी सकाळी ८.३० वाजता रेल्वेने औरंगाबादकडे निघाले. येथे ९.३० वाजता उतरल्यानंतर ते रेल्वेस्टेशन परिसरातील भारतीय स्टेट बँकेत गेले. तेव्हा बँक बंद होती. वेळ घालवण्यासाठी म्हणून ते रेल्वेस्टेशनबाहेर नाश्ता करण्यासाठी एका केळी विक्रेत्याच्या गाडीवर गेले. तेथे दोघे जण आले व रामकृपाल यास म्हणाले की, माझ्या बहिणीला चाकू मारणारा तुझ्यासारखाच माणूस आहे. तू तिकडे आमच्या बॉसकडे चल. तेव्हा रामकृपालने खिशातून १९ हजार रुपये काढले व ते ब्रिजेश यादव याच्याकडे दिले. ते पाहून त्या दोन भामट्यांनी तुलाही तिकडे यावे लागेल, असे म्हणत रामकृपाल व ब्रिजेश या दोघांना क्रांतीचौक रोडवरून अंतर्गत रस्त्याला नेले. तेथे या दोघांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवला व ब्रिजेशच्या खिशातून ५२ हजार रुपये काढून त्यांना हाकलून दिले.