जिल्हा बँकेच्या शाखेतून निराधार लाभार्थ्यांची लूट

By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:46:09+5:302014-08-04T00:52:09+5:30

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून चक्क निराधार लाभार्थ्यांची लुट करून पिळवणूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

Robbery of the dependent beneficiaries from the District Bank branch | जिल्हा बँकेच्या शाखेतून निराधार लाभार्थ्यांची लूट

जिल्हा बँकेच्या शाखेतून निराधार लाभार्थ्यांची लूट

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून चक्क निराधार लाभार्थ्यांची लुट करून पिळवणूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या बँकेत दलालांनी ठाण मांडून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू केला असल्याची तक्रार आहे. या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी निराधार लाभार्थ्यातून होत आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुरूंदा येथील शाखेत निराधार व साठ वर्षीय, अपंग लाभार्थ्यांचे अनुदान आले आहे. काही दिवसांपासून या लाभार्थ्यांची यादीच लावली नाही. विलंबाने लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले; परंतु त्यात लयलूट करून २४०० रुपयांच्या रकमेपैकी २२०० रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले. बँकेतून होणाऱ्या लयलुटीच्या प्रकारामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याच बरोबर कुरूंद्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान आले होते. त्याचीही यादी विलंबाने लावून अनुदान वाटप करण्यात आले. चिरीमिरीच्या प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा चर्चेत आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधी लूट झालेल्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या जबाबावरून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
अनुदानाची रक्कम जमा
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील निराधार लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदान उचलण्यासाठी महिला व पुरूष गर्दी करीत आहेत.
दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

Web Title: Robbery of the dependent beneficiaries from the District Bank branch