रस्त्यावरील गतिरोधक उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:05+5:302020-12-17T04:29:05+5:30
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक ...

रस्त्यावरील गतिरोधक उखडले
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक उखडले आहेत. ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिरासमोरील चौकात बसविण्यात आलेल्या हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी प्रमाणात पडत आहे. त्या हायमास्टवर फोकस बसविण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
गुरुसहानीनगरचा रस्ता उखडला
औरंगाबाद : एन-४ परिसरातील गुरुसहानीनगरमधील रस्ता मागील तीन वर्षांपासून उखडला आहे. त्या रस्त्यावरील खड्डे रेडीमिक्सने बुजविले आहेत. मात्र, तेथे रेडीमिक्स टाकण्याचे काम सुरू असताना इतर वाहने त्यावरून गेली. परिणामी बुजविलेल्या खड्ड्यांवरील रेडीमिक्स वाहनांसाठी आणखी घातक ठरत आहे.
सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी राहणार सुरू
औरंगाबाद : शासनाने डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत घोषित केलेली असून, दस्त नोंदणीसाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहदुय्यम निबंधक १, २, ३, ४, ५, ६, सहदुय्यम निबंधक वर्ग-२ सिल्लोड, दुय्यम निबंधक श्रेणी-१ पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव व खुलताबाद ही कार्यालये १९ व २६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी सुरू राहतील, असे मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक सोनवणे यांनी कळविले आहे.