शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या खरेदीने तांदूळ महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST

औरंगाबाद : सीमेवर विवाद असला तरी चीनने भारतातील तांदूळ खरेदीसाठी करार केला आहे. याचा फायदा घेत देशातील बड्या साठेबाजांनी ...

औरंगाबाद : सीमेवर विवाद असला तरी चीनने भारतातील तांदूळ खरेदीसाठी करार केला आहे. याचा फायदा घेत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे भाव क्किंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढवून विक्री सुरू केली आहे.

महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत मागील आठवड्यात तब्बल १०० टन नवीन तांदूळ विक्रीसाठी आला. जेव्हा नवीन तांदळाची आवक सुरू होते, तेव्हा तांदळाचे भाव कमी होतात. मात्र, यंदा उलटे झाले. नवीन तांदूळ येताच भाव वधारले. मागील वर्षाच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी जास्त भावात म्हणजे २९०० ते ८८०० रुपये प्रतिक्विंटल तांदूळ विक्री होत आहे. होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, तब्बल ३० वर्षांनंतर यंदा चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयातीचा करार केला आहे. यात पहिली ऑर्डर १ लाख टनाची दिली आहे. सध्या केंद्र सरकार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी मार्ग काढण्यात व्यस्त आहे. याचा फायदा उचलत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे दर वाढवून विक्रीला सुरुवात केली आहे, तसेच महाराष्ट्र व छत्तीसगड येथील धानाला काही प्रमाणात कीड लागल्याचे सांगितले जात आहे.

मागील आठवड्यातच जाधववाडी बाजार समितीच्या अडत बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. ५५०० ते ६००० रुपये प्रतिप्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भाजीमंडईत पालेभाज्यांची विशेषतः मेथीची भाजी मातीमोल भावात विकली जात आहे. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकही पालेभाज्या खरेदी करीत आहेत.

( जोड सोडत आहे)