महसूल कर्मचाऱ्यांना देणार खासगी सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:48+5:302021-02-05T04:13:48+5:30
जिल्हाधिकारी: नायब तहसीलदार संघटनेचे काम बंद आंदोलन औरंगाबाद : महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून हल्ले होण्यात वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ...

महसूल कर्मचाऱ्यांना देणार खासगी सुरक्षा
जिल्हाधिकारी: नायब तहसीलदार संघटनेचे काम बंद आंदोलन
औरंगाबाद : महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून हल्ले होण्यात वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात एका नायब तहसीलदारावर हल्ला करण्याची घटना घडल्यामुळे महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱ्यांना खासगी सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नायब तहसीलदार संघटनेने त्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी काम बंद आंदोलन केले. हे आंदोलन राज्यभर करण्यात आले. राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात अधिकारी वर्ग सहभागी होता.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, मुद्रांक उपनिरीक्षक सोहम वायाळ, सिध्दार्थ धनजकर, संतोष अनर्थे, संजय वारकड, प्रशांत काळे, सुरेंद्र देशमुख, अविनाश शिंगटे, शीतल राजपूत, एस. एन. लाड, सारिका कदम, योगिता खटावकर, वैशाली डोंगरजाळ, एस. जी. पटवारी, अप्पासाहेब शिंदे, डी. एस. भारस्कर, रामेश्वर रोडगे, राहुल गायकवाड, संजीव जाधवर, जनार्धन विधाते, उध्दव नाईक, ए. एस. भालेराव, तेजस्विनी जाधव, मंदार वैद्य, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, स्वप्नील मोरे आदी सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन:
सामूहिक रजा आंदोलन करताना राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.
फोटो कॅप्शन:
कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीत महिलांबाबत केलेल्या लिखणाचा विरोध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.