एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

By Admin | Updated: July 29, 2015 00:50 IST2015-07-29T00:19:00+5:302015-07-29T00:50:47+5:30

सोमनाथ खताळ ,बीड येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून

The responsibility of the district on one officer | एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

एकाच अधिकाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार

सोमनाथ खताळ ,बीड
येथील अन्न प्रशासन कार्यालयात केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. इतर पदे रिक्त असून, दोन महिन्यांपूर्वी रायगडहून बदली होऊन आलेले सहायक आयुक्त यांनी रुजू झाल्याच्या दिवसापासूनच रजा टाकली आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ते अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे विविध अवैध धंदे वाढलेत.
अन्न प्रशासन कार्यालयात सहायक आयुक्तासह तीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे आहेत. मात्र, या कार्यालयाला नेहमीच अधिकाऱ्यांची कमतरता भासत आली. यापूर्वी दोन अन्न सुरक्षा अधिकारी होते. त्यातील देवानंद वीर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यानंतर दुसरे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांच्याकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. तर एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची जागा अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. ४ जूनला अनिल राठोड हे रायगडहून बीडला सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले. परंतु तेंव्हापासून आजपर्यंत ते कार्यालयाकडे फिरकले नाहीत. ते आजारी रजेवर गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे दिसते.

Web Title: The responsibility of the district on one officer