उस्मानाबाद उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ दर्जाबाबत ठराव
By Admin | Updated: August 18, 2014 00:59 IST2014-08-18T00:53:33+5:302014-08-18T00:59:57+5:30
तुळजापूर : उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रास लवकरच स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा ठराव विद्यापीठ

उस्मानाबाद उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ दर्जाबाबत ठराव
तुळजापूर : उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रास लवकरच स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा ठराव विद्यापीठ अधिसभेने घेतला असून, औरंगाबाद येथील विद्यापीठास राज्यातील पहिले केंद्रीय विद्यापीठ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. येथे रविवारी ‘आम्ही तुळजापूरकर’ या पुस्काराचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी डॉ. चोपडे बोलत होते. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, सिने अभिनेते नंदू माधव, प्रा. काळे, नगराध्यक्षा जयश्री कंदले, चोपडे, दुर्गादास अमृतराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चोपडे म्हणाले, उस्मानबाद जिल्हा व परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी शक्ष्ौणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्याचा मानस आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ व उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली. प्रा. अमृतराव यांनी लिहिलेल्या पुस्तकातून तुळजापुरातील नामवंत व्यक्ती, महत्त्वाचा जीवन प्रवास उल्लेखनीय असल्याचेही डॉ. चोपडे म्हणाले. यावेळी सिने अभिनेते नंदू माधव म्हणाले, या साहित्यातून तुळजापूरकरांची श्रेष्ठता दिसून येते. सर्व जाती-धर्मातील नामवंत व्यक्तींचे प्रवासवर्णन यातून मांडले असून, या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावले असता २४ चित्रपटांची निर्मितीही होऊ शकेल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक पुस्तकाचे लेखक प्रा. सुयोग अमृतराव तर सूत्रसंचालन आनंद मुळे यांनी केले. आभार. प्रा. विक्रम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. संभाजी भोसले, संदीप अमृतराव, किशोर गंगणे, लालासाहेब मगर, काकासाहेब शिंदे, उत्तम अमृतराव, प्रशांत अमृतराव, राजाभाऊ साळुंके, तुळशीदास साखरे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)