शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिलासा! आता चौथीसाठी पाच हजार, तर सातवीसाठी साडेसात हजारांची शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:35 IST

शालेय शिक्षण विभागाकडून नियमात सुधारणा, चालू वर्षी चार वर्गांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात यावर्षीपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पहिले पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात येत होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाने परीक्षेसाठीच्या वर्गात बदल केला आहे. यावर्षीपासून चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. त्याविषयीचे अर्ज भरण्यासह सुरुवात झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीशालेय शिक्षण विभागाने यावर्षीपासून चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला आहे.

यंदा कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसता येणार?यावर्षीच शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात बदल केला. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे नोटीफिकेशन निघालेले असल्याने यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. पुढील वर्षी मात्र, केवळ चौथी आणि सातवीतील विद्यार्थी सहभागी असणार आहेत.

कशामुळे केला बदल?जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या परीक्षेला बसतात. मात्र, अनेक गावांतील शाळा या चौथीपर्यंतच आहेत. त्याशिवाय काही गावातील शाळा फक्त सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागते. त्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

कधीपासून होणार लागू?यावर्षीपासूनच हा बदल लागू करण्यात येणार आहे. त्याविषयीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

कोणत्या वर्गासाठी किती शिष्यवृत्ती?चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना ५०० रुपये याप्रमाणे वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याशिवाय सातवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना ७५० रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये दिले जाणार आहेत. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे.

कधी घेतली जाणार परीक्षापाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्याचे नियाेजन केले आहे. याविषयीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीतील सर्वाधिक विद्यार्थी बसतील. याकडे प्राथमिक विभाग लक्ष देत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने भरारी घेतलेली आहे. त्यात यावर्षी आणखी प्रगती करण्याचा प्रयत्न असणार आहे.- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Scholarship Relief: ₹5000 for 4th, ₹7500 for 7th Students!

Web Summary : Maharashtra changes scholarship exams to 4th & 7th grades. ₹5000 & ₹7500 annual scholarships will be deposited into student accounts for three years. Exams for 4th and 7th are planned in April-May.
टॅग्स :Educationशिक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर