शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय पथकाचा मोसंबी बागा पाहणी दौरा

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली.

औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली. जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमणावर मोसंबीची फळगळ होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर याची पाहणी करण्यासाठी कृषी सहसंचालक कार्यालयाने विभागीय पथकाची स्थापना केली होती. या पथकाने आज औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, इब्राहीमपूर, पिंप्री राजा, पाचोड, आपतगाव, भालगाव आदी गावांना जाऊन तेथील मोसंबीच्या बागांची पाहणी केली.पथकात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, विभागीय कृषी अधीक्षक रमेश गोसावी, जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे, उप विभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र कुलथे यांचा समावेश होता. पावसाच्या पाण्याचा निचरा करून बागांची स्वच्छता ठेवल्यास मोसंबी फळांची गळ थांबविण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. एका बहराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहरासाठी बाग ताणावर सोडू नये, तसेच झाडाची क्षमता पाहून फळे धरावीत व जास्तीच्या फळासाठी अन्न मूलद्रव्याचे व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारसीनुसार करून ताबडतोब रिडोमिल या बुरशी नाशकाची फवारणी करावी, फळगळीची वा कुठल्याही प्रकारची समस्या शेतकऱ्यांना आल्यास कृषी विभाग व कृषी विद्यापीठाशी संपर्क केल्यास निश्चितच मदत मिळेल, असे जनार्दन जाधव यांनी सांगितले. पाहणी दौऱ्याच्या पथकाच्या निष्कर्षानुसार ही फळगळ बुरशीजन्य रोगापासून झालेली असून गळीचे प्रमाण अल्प स्वरूपात आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन रमेश गोसावी व पंडित लोणारे यांनी केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी राठोड, सुभाष पठाडे, उत्तम गोरडे, रामेश्वर घोडके, रामेश्वर पवार, भगवान गावंडे, भारत पवार आदी मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.