शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खात्यावरील रक्कम परत करा

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने

उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत अशा लाभार्थ्यांच्या नावे जमा असलेले अनुदान तातडीने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांना दिले आहेत. तसेच गारपीटीचे अनुदान वाटप न केलेल्या बँकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाच्या वतीने निराधारांसाठी श्रावणबाळ, संजय गांधी आदी योजना राबवून यातून त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनुदान दिले जाते. परंतु, संबंधितांना हे अनुदान वेळच्या वेळी मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी जिल्ह्यात बँकांकडे अशा अुनदानापोटी जमा झालेल्या रकमांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील बहुतांश बँकामधून शासकीय योजनेच्या विविध लाभार्थ्यांच्या नावे प्रशासनाकडून पैसे जमा करण्यात आले असले तरी बहुतांश बँकांकडून योग्य पध्दतीने वाटप होत नसल्याचे उघड झाले होते. तसेच काही बँकांमधील या योजनेअंतर्गतचे लाभार्थी मयत असतानाही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा असल्याचेही या पाहणीत दिसून आले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १२ हजार ३०१ लाभार्थी असून, त्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत २ कोटी ४५ लाख ४९० रूपये प्रशासनाच्या वतीने विविध बँकांत जमा करण्यात आले होते. १३ आॅक्टोबर रोजी बँकाची तपासणी केल्यानंतर तालुक्यातील ११५ मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ लाख ९२ हजार ६१० रूपये जमा असल्याचे उघडकीस आले. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत ही रक्कम तातडीने संबधित बँकेने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)उमरगा येथील सहाय्यक निबंधक व गटविकास अधिकारी तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने उमरगा तालुक्यातील बँकाची तपासणी केली असता काही बँकांनी ग्राहकांकडून जादा सेवा शुल्क आकारणी केल्याचेही उघड झाले आहे. यात स्टेट बँक हैद्राबाद (दाळींब), बँक आॅफ महाराष्ट्र (येणेगूर), महाराष्ट्र ग्रामीण बँक (नाईचाकूर), स्टेट बँक आॅफ इंडिया (उमरगा), बँक आॅफ इंडिया (उमरगा), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (तुरोरी), स्टेट बँक आॅफ हैद्राबाद (मुरुम) या बँकानी सात टक्के पेक्षा जादा दराने व्याजाची आकारणी करून सेवा शुल्कापोटीही १ हजार ५० रूपये आकारल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौदा शाखा तसेच नाईचाकूर व आलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उमरगा शाखेतून गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप झाले नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गारपिटीचे अनुदान रखडले४तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गारपीटग्रस्त ५४ हजार ३६६ शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी ४०५५.८१ लक्ष एवढा निधी बँकांकडे वितरित करण्यात आला होता. यातील २२७.७२ लक्ष रुपये अद्यापही वाटप झाले नसून, त्या बँकांवरही आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.