शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपाससाठी चार निविदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:00 IST

विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देअजिंठा रस्त्याचे काम बंदच कंत्राटदाराने पोबारा केल्याने सहा महिन्यांपासून ठप्प पडले काम

औरंगाबाद : बीड बायपासचे काम ३८३ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहे. यात रुंदीकरणासह उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविलेल्या निविदांना चार परप्रांतीय कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. 

औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीने घेतले होते. तो कंत्राटदार अवसायनात निघाल्यामुळे त्याने पोबारा केला. रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यामुळे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या राज्य विभागाला नव्याने कंत्राटदार शोधून ते काम सुरू करण्यासाठी धावपळ करावी लागली.हा सगळा प्रकार सहा महिन्यांपासून सुरू असताना बांधकाम विभागाने मागविलेल्या ३८३ कोटींच्या निविदांना बाहेरच्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे या कामाचेही औरंगाबाद-सिल्लोड या रस्त्याच्या कामासारखे होणार नाही, याची हमी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

३८३ कोटींतून करणार काय?३८३ कोटींतून १४ कि़मी. रस्त्यांचे कोणते काम करणार, किती उड्डाणपूल बांधणार. भुयारी मार्गांचा काही समावेश आहे काय? शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधणार की नाही. देवळाई चौकातील वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत तांत्रिकदृष्ट्या काय उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्या बाबींचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मध्ये काही विचार केला आहे की नाही. याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर आणलेली नाही. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ३७९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून दिल्लीतील मुख्यालयाला पाठविला होता. परंतु त्याबाबत आजवर काहीही निर्णय झाला नाही. बायपास हस्तांतरित करण्यावरून कायदेशीर बाबी पुढे आणल्याने तो डीपीआर रद्द झाल्यात जमा आहे. त्या डीपीआरमध्ये तीन उड्डाणपूल व रुंदीकरणासह इतर कामांचा समावेश होता. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा