लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:43 IST2019-07-27T23:42:57+5:302019-07-27T23:43:23+5:30

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये दोन महिने राहिल्यानंतर लग्नाला नकार देणाºया प्रियकराविरुद्ध पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

Rape against a lover who refuses marriage | लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये दोन महिने राहिल्यानंतर लग्नाला नकार देणाºया प्रियकराविरुद्ध पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदविला.
अब्दुल सलाम शेख (४०, रा. जिन्सी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जिन्सी परिसरात राहणाºया पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या इमारतीत भाड्याने राहत होते. त्यामुळे पीडिता ही तेथे जात होती. तिची आणि आरोपी यांच्यात सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र पहिल्या पतीपासून घटस्फोट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने पतीपासून घटस्फोट घेतला. ४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत पीडिता आणि आरोपी ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये होते. या काळात ते एकाच घरात राहत होते. तेव्हा त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले. १ जूनपासून आरोपीने तिला टाळण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरल्यानंतर तो तिला सोडून गेला. एवढेच नव्हे, तर त्याने लग्नाला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि फोनवरून पीडितेला धमक्या दिल्या. २६ जुलै रोजी तिने जिन्सी ठाणे गाठून आरोपी अब्दुल सलाम याच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Rape against a lover who refuses marriage