शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रवेशासाठी रात्रीपासून रांगा

By admin | Updated: June 16, 2016 00:11 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आपल्या पाल्याला नामांकित शाळामध्ये कोणत्याही परिस्थिीत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच शाळेच्या आवारात गर्दी केली

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईआपल्या पाल्याला नामांकित शाळामध्ये कोणत्याही परिस्थिीत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच शाळेच्या आवारात गर्दी केली. काही पालकांनी तर शाळेच्या प्रवेशद्वारावरच मुक्काम ठोकला. बुधवारी नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत प्रवेशासाठी पडलेली पालकांची उडी लक्षवेधी ठरली.आपला पाल्य दर्जेदार शिक्षण घेऊन गुणवंत व्हावा ही अपेक्षा बाळगून आलेल्या पालकांना कशाचीही तमा नसते. याचा प्रत्यय रात्रीपासून लागलेल्या रांगांमधून समोर आला. मंगळवारी रात्री नऊ वाजता योगेश्वरी नूतन विद्यालय व खोलेश्वर विद्यालयाच्या आवारात पालकांची गर्दी झाली. पाल्याला प्रवेश मिळेल की नाही याची चिंता बाळगून असलेल्या काही पालकांनी प्रवेशद्वारावरच अंथरून टाकून मुक्काम करणे पसंद केले. तब्बल १२ तास ताटकळल्यानंतर प्रवेशद्वार उघडले. मात्र, बऱ्याच पालकांना उशिरा आल्यामुळे पाहिजे त्या शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांची धांदल उडाली होती. तर ज्या पालकांनी रात्री नऊ वाजल्यापासून रांगेत रात्र काढली अशा पालकांना दिलासा मिळाला. एकाच दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे जोपर्यंत आपल्या पाल्याला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत पालकांमध्ये धास्ती कायम असते. शाळेतील विद्यार्थ्यांची मर्यादित संख्या व नामांकित शाळांकडे वाढता ओढा याचा मोठा फटका अनेक पालकांनी निमूटपणे सहन केला. दरम्यान, ज्या पालकांना प्रवेश मिळाले त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, काहींना उशिरा आल्यामुळे प्रवेश भेटू शकला नाही. त्यामुळे त्यांची निराशा झाली. मोठ्या प्रमाणावर पालक प्रवेशासाठी आल्यामुळे शाळा प्रशासनाची देखील तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते.संजय तिपाले ल्ल बीडआरटीई (बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९) नुसार अनुसूचित जाती-जमाती दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाची सुविधा आहे. या प्रक्रियेत ‘शाळा’ झाल्याचे उघड झाले आहे. आॅनलाईन नोंदणीपेक्षा दुप्पट विद्यार्थी दाखवून सोडत काढल्याने मोफत प्रवेश प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.जिल्ह्यात १५० विनाअनुदानित इंग्रजी शाळा आहेत. आरटीईनुसार या शाळांनी मोफत प्रवेश देण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, जिल्ह्यातील १२७ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून १५७९ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत होते. त्यासाठी पसंतीच्या शाळांकडे आॅनलाईन प्रवेश नोंदणी करावयाची होती. त्यानुसार १० जून या अखेरच्या तारखेपर्यंत ५२० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केल्याचे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिसत आहे. २१ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यामुळे तेथे सोडत पद्धतीने निवड करावयाची होती. जि. प. शिक्षण विभागाने मात्र २५ टक्के कोट्यातून प्रवेशासाठी १०२८ विद्यार्थ्यांची नोंदणी असल्याचे दाखवले. हीच आकडेवारी गृहीत धरून सोडत काढण्यात आली आहे. २१ शाळांमध्ये २२८ जागा २५ टक्के कोट्यासाठी राखीव होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळानिहाय नोंदणी केलेल्या विद्यार्थी संख्या व शिक्षण विभागाने सोडत काढताना दाखवलेली विद्यार्थी संख्या यात प्रचंड तफावत आहे. सोडत प्रक्रियेवेळी खुद्द सीईओ, डेप्युटी सीईओ व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. मात्र, त्यांना अंधारात ठेवून आकडेवारीत घोळ करीत संस्थाचालकांचे हीत जपण्याचा ‘चोपडे’पणा कसा काय झाला ? याचीच चर्चा सध्या रंगू लागली आहे.