शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यात रोजगारासाठी रांगा

By admin | Updated: July 6, 2014 00:36 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद खरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत.

साहेबराव हिवराळे , औरंगाबादखरीप हंगामाच्या निमित्ताने गावाकडे गेलेले हंगामी मजूर दुष्काळाच्या सावटामुळे शहराकडे परतत आहेत. दहावी, बारावी, पदवीधरांनी औद्योगिक क्षेत्र, मॉल, कॉल सेंटरवर रोजगाराचा शोध सुरू केला आहे; परंतु पाणीटंचाई, वाळू, खडीचे भाव भडकल्यामुळे बांधकामे बंद आहेत. पर्यायाने मजूर बेरोजगार झाला आहे.गेल्या महिन्यात मजुरांची टंचाई होती. जूनअखेर हंगामी मजूर कुटुंबियांसह शहरात आल्यामुळे कामगार नाक्यावर मजुरांची गर्दी वाढली आहे. मजुरांचा पुरवठा जास्त झाला आणि कामे कमी झाली आहेत. आठ-आठ दिवस काम किंवा रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांची व कुटुंबियांची उपासमार होत आहे. औरंगाबादेत मजुरांची टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतील मजूर पुन्हा परतले आहेत. त्यांना एक महिन्यापासून काम नाही. तेही आता दुष्काळी जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे बांधकामासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पैसे का गुंतवावेत, असा विचार अनेकांनी केला आहे. गेल्या महिन्यात मजूर मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांत खूप स्पर्धा होती. ग्रामीण भागात वाहने पाठवून मजुरांची ने-आण केली जायची. आता नाक्यावर मजुरांची टंचाई नाही. नुकतीच पदवी मिळविलेले विद्यार्थी आवडीनुसार नोकरीच्या शोधात दिसतात.खेड्यात, शेतावर राबण्यापेक्षा मॉल किंवा मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरवर कामासाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी दिसत आहे. गर्दीत कुशल कामगार नाहीतऔरंगाबाद शहरात व औद्योगिक क्षेत्रातील नाक्यावर खेड्यातील मजूर येत असून, हंगामी मजूर मिळत असले तरी कुशल कामगारांची कमतरताच जाणवते. नवीन औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधीतून कुशल कामगारांची आजही गरज आहे, असे मासिआचे संपर्क अधिकारी फुलचंद जैन यांनी सांगितले. साहित्य महागलेबांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अनेकांनी बांधकामे थांबविली असून, खेड्यातील मजूर शहरात आले असले तरी त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पाऊस असल्यास दुष्काळसदृश स्थिती पालटेल अशी अपेक्षा आहे, असे भगवान गायकवाड यांनी सांगितले.हाताला काम मिळालेच पाहिजेऔद्योगिक क्षेत्रात बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे. कारण त्यांच्यावर शिक्षणासह कुटुंबियांचीही जबाबदारी असते. अकुशल कामगारांना कुशलतेकडे नेण्याचे कामही घेतले जावे, अशी मागणी कामगार नेते अनिल जाभाडे, किशोर जाधव यांनी केली.