बीड शहरातील रामतीर्थनगर पाण्याविनाच !

By Admin | Updated: April 14, 2015 00:32 IST2015-04-14T00:32:48+5:302015-04-14T00:32:48+5:30

बीड : शहरातील एमआडीसी परिसरातील रामतीर्थनगर भागात मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणीच आले नाही. चक्क वयोवृध्दांना देखील हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लगात

Ramdeethanagar in Beed city without water! | बीड शहरातील रामतीर्थनगर पाण्याविनाच !

बीड शहरातील रामतीर्थनगर पाण्याविनाच !


बीड : शहरातील एमआडीसी परिसरातील रामतीर्थनगर भागात मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणीच आले नाही. चक्क वयोवृध्दांना देखील हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लगात असल्याचे चित्र रामतीर्थनगर भागात सोमवारी पहावयास मिळाले.
बीड शहरातील पिण्याच्या पाण्याने रोद्र रूप धारण केले आहे. शहरातील काही भाग असे आहेत की, त्याठिकाणी पिण्याचे पाणी पंधरा-पंधरा दिवस येत नाही. सोमवारी एमआडीसी परिसरातील रामतीर्थनगर भागात रहाणाऱ्या नागरीकांनी बीड पालिकेच्या गलथान कारभारा विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. निवडणूकांच्या काळात पिण्याच्या पाण्याबाबत केलेला जाहीरनामा पालिकेचे पदाधिकारी विसले आहेत. अशा शब्दात परिसरातील महिला व नागरीकांनी रोष व्यक्त केला.
परिसरातील दोन्ही हातपंप बंद
रामतीर्थनगर भागात दोन हात पंप आहेत. एक हातपंप तर मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजून गेलेला आहे. तर दुसऱ्या हातपंपाला पाणी नाही. अशा परिस्थितीत आम्ही पाणी कोठून आणायचे असा सवाल येथील सिताबाई आरे, सावित्रा कांबळे, अर्चना हातंगळे, लक्ष्मीबाई मोरे, रूक्मिण वरवट यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Ramdeethanagar in Beed city without water!