शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रमजानपुरती अखंड वीज; भारनियमन सध्या लांबले

By admin | Updated: June 14, 2016 23:55 IST

औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही या काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातही तांत्रिक कारणांमुळे वीज गुल होत आहे. त्यात आता मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू झाला आहे.या काळात मुस्लिम धर्मीय दिवसभर कडक उपवास करतात. केवळ सूर्योदयापूर्वी आणि सूर्याेदयानंतरच ते जेवण घेतले जाते. त्यामुळे या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने ७ जून ते ६ जुलै या कालावधीत २४ तास वीज सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तोपर्यंत अ, ब, क, ड, ई, फ आणि जी गटातील सर्व फिडर आणि सिंगल फेजिंगच्या फिडरवर असलेले फिडर भारनियमन रद्द करण्यात आले आहे. मात्र, स्वतंत्र कृषी वाहिनीवरील आणि सिंगल फेजिंग वाहिनीवरील कृषिपंपांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, शहरात वीज चोरीचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे महावितरणकडून या ठिकाणी लोडशेडिंग लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. चोरीचे प्रमाण कमी न झाल्यास रमजाननंतर शहरात लोडशेडिंग लागू होण्याची दाट शक्यता आहे. ...तर ९ तासांपर्यंतचे भारनियमनमहावितरणच्या शहरातील ८४ पैकी ७६ फिडरवर ४२ ते ७५ टक्क्यांपर्यंत वीज हानी होते आहे. वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनुसार या सर्वच ठिकाणी भारनियमन लागू होऊ शकते. तसे झाल्यास या फिडरवर सरासरी ६ तासांपासून ९.१५ तासांपर्यंत भारनियमन होऊ शकेल, असे महावितरणने कळविले आहे. भारनियमन टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजचोरी न करता नियमितपणे बिल भरावे असे आवाहनही महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.