शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

अनाथलयातील रक्षाबंधन...

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

गजानन वानखडे जालना येथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़

गजानन वानखडे जालनायेथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़येथील कै़ राधाबाई अनाथालयात एकूण २०० अनाथ बालकांना अनेक सणापैकी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमळ बंधनाच्या सणाला येथील बालके आपल्या बहिणीच्या आठवणीने व्याकूळ होतात. दरवर्षी ते या सणाची आतुरतेने वाट पाहतात. कारण येथील अनेक बालकांचे आई-वडील हयात नाहीत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे बहिण देखील आपल्याला राखी बांधायला येत नसल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते़ परंतु शहरातील अनेक गृपच्या महिलांनी या विद्यार्थ्यांना राखी बांधत असल्याने आम्हाला आमच्या बहिणीची आठ़वण येते, अशी प्रतिक्रियाही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आम्ही या सणाची दिवाळीपेंक्षाही आतुरतेने वाट पाहत असल्याचे सचिन खरात या बालकाने सांगितले. आम्हाला बहिणीचे काय नाते असते ते आम्हाला राखी बांधल्यावरच कळते कारण असे प्रेमाने ओवाळून पेढा चारणे आम्ही कधी बघितलेच नाही. त्यामुळे गेल्या वर्षी जैन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आम्हाला राखी बांधली होती. तेंव्हा आम्हाला बहिणीचे एक दिवस का होईना, बहिणीचे प्रेम बघायला मिळते. आकाश आव्हाड या विद्यार्थ्याने शहरातील विविध संस्था, संघटना आम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत असल्याने आम्हाला एक दिवस का होर्इृना बहिणीचे पे्रम मिळते आणि आपलीच बहिण असल्यासारखे वाटते़ आम्ही आज सकाळी रक्षाबंधनानिमित्त टिव्हीवर बहिण- भावाचे नाते सांगणारा चित्रपट पाहात होतो, असेही आकाश म्हणाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.