शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश

By admin | Updated: May 19, 2014 00:15 IST

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून विजय मिळविलेले काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टीम तयार

 हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून विजय मिळविलेले काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टीम तयार करून विशेष प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळेच त्यांना विजय मिळविता आला. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद गेल्या चार वर्षापासून यशस्वीपणे सांभाळणार्‍या आ. राजीव सातव यांनी नवी दिल्ली येथे राहून प्रत्येक राज्यात निवडणूक प्रचाराच्या वेळी कशी यंत्रणा राबविली जाते? याचा चांगलाच अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या प्रचाराच्या वेळी वेगवेगळे प्रयोग करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला चांगलेच यश मिळाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता त्यांनी विशेष टिम तयार केल्या. त्यानुसार वसमत विधानसभेची जबाबदारी दत्तराव लोंढे व सुनील पाटील गोरेगावकर यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रारंभी येथे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मिलिंंद यंबल यांनीही प्रचाराची व्युव्हरचना केली. त्यानुसार प्रचारही सुरू केला; परंतु त्यांच्यावर सातव यांनी सर्व मतदारसंघातील प्रचाराच्या समन्वयाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी यंबल यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून यशस्वीपणे पार पाडली. कोठे अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे? कोणता स्थानिक नेता नाराज आहे? आदी बाबी ओळखून यंबल यांनी संबंधितांची नाराजी दूर केली व त्यांना काँग्रेसच्या बाजूने वळविले. हिंगोली विधानसभेची जबाबदारी अजित मगर व बाळासाहेब मगर यांच्यावर होती. तर कळमनुरी आणि किनवट विधानसभेची जबाबदारी डॉ. संतोष टारफे व रमेश जाधव यांच्यावर होती. त्यांनीही ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली. विशेषत: डॉ. टारफे यांनी आपले कसब पणाला लावून मतांची आकडेवारी काँग्रेसच्या बाजूने कशी वाढेल? याकडे लक्ष दिले. उमरखेड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी बाबा नाईक व दिलीप देसाई यांच्यावर होती. त्यांनीही सातव यांचा विश्वास सार्थ ठरविला. हदगाव विधानसभेची जबाबदारी संजय बोंढारे व धनंजय पाटील यांच्यावर होती. त्यांनीही ही जबाबदारी परिपुर्णपणे निभावण्याचा प्रयत्न केला. या सर्व टीम स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होत्या. या शिवाय उमरखेड व कळमनुरी विधानसभा मतदार संघाकरीता दिल्ली येथील १० जणांची विशेष टिम वेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवित होती. मतांची आकडेवारी जुळविणे, प्रचारांकरीता वाहने व अन्य साहित्य उपलब्ध करून देणे आदी कामेही वाटून देण्यात आली होती. विशेष म्हणजे दिवसभर केलेल्या प्रचाराचा रात्री उशिरा आ. सातव स्वत: आढावा घेत. काँग्रेसची पारंपारिक मते कायम कशी राहतील. व शिवसेनेच्या बाजूने जाणारी मते काँग्रेसकडे कसे वळतील याची पुरेपूर खबरदारी सातव यांनी घेतली. या नियोजनबद्ध प्रचारामुळे त्यांना यश मिळविता आले. (जिल्हा प्रतिनिधी) दिल्लीतील कसब लावले पणाला गेल्या चार वर्षांपासून अखिल भारतीय युवक काँंग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत असता देशभरात झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या पद्धतीचा अभ्यास करून सातव यांनी या लोकसभा निवडणुकीत वापरली प्रचाराची वेगळी पद्धत. काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी विधानसभा मतदार संघांच्या समन्वयकाची महत्वपूर्ण भूमिका निभावली. कळमनुरी व उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी दिल्ली येथील १० जणांच्या विशेष पथकाने घेतले परिश्रम. मतांची आकडेवारी काँग्रेसच्या बाजुने वाढावी, यासाठी टिममधील प्रत्येक सदस्याने घेतली खबरदारी.