राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:06 IST2025-06-05T08:05:17+5:302025-06-05T08:06:00+5:30

राजेंद्र दर्डा यांच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारिता आणि राजकारणातील गौरवशाली कारकिर्दीचा सन्मान

Rajendra Darda awarded with prestigious ‘World Record of Excellence’ award in England | राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारिता आणि राजकारणातील गौरवशाली कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी तसेच सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’(मध्य भारत)चे उपाध्यक्ष डॉ. सतीश उपाध्याय यांच्या हस्ते व नंदकिशोर सराफ आणि सुरेश पारीख यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल राजेंद्र दर्डा यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे आभार मानत, अशा पुरस्कारांमुळे सार्वजनिक जीवनात काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे सांगितले.

पुरस्काराच्या ज्युरी समितीच्या सदस्यांकडूनही राजेंद्र दर्डा यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. ज्यात हेनरी  आर. (अध्यक्ष, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, युरोप),  पाब्लो स्टॅनले (अध्यक्ष, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंड),  संजय पंजवानी (उपाध्यक्ष, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स) यांचा समावेश आहे. सर्वांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि दर्डा यांच्या सेवा आणि नेतृत्वाप्रति असलेल्या अढळ वचनबद्धतेचे कौतुक केले.

Web Title: Rajendra Darda awarded with prestigious ‘World Record of Excellence’ award in England