रेल्वेचे तत्काळ तिकीट 'छू मंतर'! प्रवाशांना वेटिंग, पण एजंटांना २०० रुपये देताच कन्फर्म तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:35 IST2026-04-17T15:31:56+5:302026-04-17T15:35:02+5:30

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर एजंटांचीच गर्दी; 'तत्काळ' तिकिटांच्या काळाबाजाराकडे आरपीएफचा कानाडोळा

Railway's Tatkal ticket 'Chhu Mantar'! Passengers wait, but confirmed ticket after paying Rs 200 to agents | रेल्वेचे तत्काळ तिकीट 'छू मंतर'! प्रवाशांना वेटिंग, पण एजंटांना २०० रुपये देताच कन्फर्म तिकीट

रेल्वेचे तत्काळ तिकीट 'छू मंतर'! प्रवाशांना वेटिंग, पण एजंटांना २०० रुपये देताच कन्फर्म तिकीट

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून, बहुतांश रेल्वे ‘वेटिंग’वर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकृत वेबसाइटवर काही सेकंदांत तत्काळ तिकीट ‘नॉट अव्हेलेबल’ दाखवते, तर रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षातही तत्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी सामान्य प्रवाशांना अक्षरशः नाकीनऊ येत आहेत. याठिकाणी प्रवाशांऐवजी एजंटांचीच गर्दी अधिक असते. याकडे रेल्वे सुरक्षा बलाचा (आरपीएफ) कानाडोळा होत असून, एजंटांना प्रत्येक तिकिटामागे २०० रुपये जास्त मोजताच कन्फर्म तिकीट मिळत असल्याची स्थिती आहे.

रेल्वे स्टेशनवर सकाळी १० वाजता तत्काळ तिकीट देण्याची सुरुवात होते. परंतु, तिकीट देण्याची सुरुवात होण्यापूर्वीच सकाळीच एजंट कक्षासमोर ठाण मांडून बसतात. याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाकडून गस्तही होत नसल्याची ओरड होत आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येचा गैरफायदा घेत अनेक एजंट ‘तत्काळ’ तिकिटांची दुकानदारी करत आहेत. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, नियमितपणे गस्त घातली जात असल्याचे सांगण्यात आले.

रिकाम्या धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसपुरतेच ओटीपी प्रमाणीकरण
रेल्वे स्टेशनसह पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करताना वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणिकरण करणे आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. मात्र, आजघडीला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसपुरतेच ओटीपी प्रमाणिकरण सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एजंटांचा ‘उद्योग’ कायम असल्याची स्थिती आहे.

Web Title : तत्काल टिकट घोटाला: यात्रियों को वेटिंग, एजेंटों की चाँदी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तत्काल टिकट प्रणाली का फायदा उठाते एजेंट, ओटीपी को दरकिनार कर रहे हैं। यात्रियों को वेटिंग लिस्ट का सामना करना पड़ता है, जबकि एजेंट अतिरिक्त शुल्क पर टिकट बुक करते हैं, जिससे रेलवे सुरक्षा पर सवाल उठते हैं।

Web Title : Tatkal Ticket Racket: Agents Thrive as Passengers Face Waiting Lists

Web Summary : Agents exploit Tatkal ticket system in Chhatrapati Sambhajinagar, bypassing OTP for profit. Passengers face waiting lists while agents confirm tickets for extra charges, raising concerns about railway security negligence.