शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईननंतरही रांग लावावीच लागणार

By admin | Updated: September 4, 2014 00:54 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात येऊन अर्ज भरण्याचा हेलपाटा कमी व्हावा, यासाठी आॅनलाईन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे;

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात येऊन अर्ज भरण्याचा हेलपाटा कमी व्हावा, यासाठी आॅनलाईन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे; परंतु आॅनलाईन अर्ज केल्यानंतरही पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आॅनलाईन अर्जाची प्रिंट, आवश्यक ती मूळ कागदपत्रे, झेरॉक्स प्रती घेऊन आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावेच लागणार आहे, त्यामुळे या सुविधेमुळे लर्निंग लायसन्ससाठी केवळ चाचणी देण्यासाठी तारीख निश्चित करता येत असल्याने वाहनधारकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाने १ सप्टेंबरपासून आॅनलाईन अपॉइंटमेंटची सुविधा सुरू केली आहे. यामधून लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) मिळविण्यासाठी वाहनधारकांना आता आॅनलाईन अर्जाची मुभा देण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसेन्स, परमनंट लायसेन्स असो की, अन्य काही कामे; स्वत:च करताना वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे नाइलाजाने वाहनधारकांना लर्निंग लायसन्ससह अनेक कामांसाठी एजंटकडे जाण्याची वेळ येते. शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आल्यानंतर या सगळ्यापासून सुटका होईल, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. इंटरनेटची सुविधा असणाऱ्या कोणत्याही ठिकाणाहून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अर्जदारांना आता इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. वेळप्रसंगी दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अर्जदारांना संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन आवश्यक ती माहिती भरावी लागेल. यानंतर चाचणीसाठी पूर्ववेळ निश्चित करावी लागेल आणि त्या दिवशी आरटीओ कार्यालयात हजर राहावे लागेल.आजपासून आॅनलाईनची सक्तीलर्निंग लायसन्ससाठी गुरुवारपासून आॅनलाईन अर्जाची सक्ती केली जाणार आहे. असे असताना बुधवारी काही जणांना आॅनलाईन अर्जासाठी परत पाठविण्यात आले, तर काही जणांची आॅनलाईन अर्जाशिवाय चाचणी घेण्यात आली. आॅनलाईन अर्ज भरण्यामध्ये काही अर्जदारांना अडचणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.