शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:28 IST

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़

 श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़ यापैकी ३ गायी मृत्यूमुखी पडल्या़ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील शेतकरी विक्रम सुंदरसिंग राठोड यांनी त्यांच्या शेतात शेनखत मिळावे या हेतुने नजिकच्या ४ ते ५ गावांतील शेतकर्‍यांची ११० गायी, बैल चारा व इतर सुविधा देवून शेतात आणले होते़ गायी चरत असताना शेजारील शेतात उगवलेले ज्वारीचे पिल (कोवळे झाड) दिसल्याने २० ते २५ गायींनी ते खाल्ले़ त्यानंतर या गायींना विषबाधा झाल्याने त्यातील तीन गायी अत्यवस्थ झाल्या़ राठोड यांनी आष्टा येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़चेपुरे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होत नसल्याने त्यांनी त्या गायींना त्याच अवस्थेत सोडून पशूचिकित्सालय गाठून कंपाऊंडरला घटनास्थळी आणले़ तोपर्यंत ३ गायी दगावल्या़ त्यानंतर खासगी पशू चिकित्सकांची मदत घेवून गायी, बैलांवर उपचार करण्यात आले़ माहूर तालुक्यातील चोरड, आष्टा, साईनगर, पार्डी, हिवळणी येथे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या असून प्रत्येकवेळी पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची हलगर्जी समोर आल्याने या पशूवैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष प्राणीवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे़ (वार्ताहर)