शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चा

By admin | Updated: May 15, 2014 00:05 IST

अंबाजोगाई: दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला

अंबाजोगाई: महाराष्ट्रात दलितांवरील वाढते अन्याय व अत्याचार याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी अण्णा भाऊ साठे युवा आंदोलनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना देण्यात आले. अण्णा भाऊ साठे युवा आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये रोज दलितांवर अन्याय, अत्याचाराची मालिका चालू आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. शासन व प्रशासन ह्या घटनांकडे लक्ष देत नाही. फक्त फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांची नावे घ्यायची व सत्ता हस्तगत करायची व जातीवादाला खतपाणी घालायचे काम करीत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राची परिवर्तनवादी जनता सहन करणार नाही. दलितांवरील अत्याचार रोखण्यास शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. यासाठी खालील मागण्या घेऊन राज्यातील दलित अत्याचार विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मागण्या दत्ता काळेच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करणे. दत्ता काळे, संजय गायकवाड, नितीन आगे, उमेश आगळे, मनोज कसाब यांच्या खुनांचा तपास सी.आय.डी. किंवा सी.बी.आय. मार्फत करण्यात यावा. वरील सर्व पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करा. अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जळवबन येथील वैरागे या तरुणीस आत्महत्या करण्यास भाग पाडणार्‍या आरोपींवर कडक कारवाई करावी. नगर व बीड जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहिर करण्यात यावा. त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी. या मागण्या पूर्ण करण्यास शासन व प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर संघटना रस्त्यावर उतरेस असा इशारा देण्यात आला. या मोर्चात दशरत कांबळे, अविनाश हजारे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालके, बळीराम उपाडे, अमोल काळे, समाधान काळुंके, अ‍ॅड. लोखंडे, पांडुरंग जोगदंड, हिरामण पाटोळे, जोगदंड मारुती, महादेव हजारे, दत्ता उपाडे, संतोष पारधे, अमोल वाघमारे, अर्चना वायदंडे, मनीषा काळे, कमलाकर जोगदंड, संतोष पारधे, अमोल खरात, मुन्ना सरवदे, लक्ष्मण कांबळे, आदींची उपस्थिती होती. या मोर्चाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (वार्ताहर)