राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत प्रियंकाला कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:36 IST2017-12-01T00:36:14+5:302017-12-01T00:36:42+5:30

गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत बजाजनगर ज्युदो क्लबच्या प्रियंका गुप्ता हिने १७ वर्षांखालील ३६ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले.

Priyanka Chopra in National Judo Tournament | राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत प्रियंकाला कास्य

राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत प्रियंकाला कास्य

औरंगाबाद : गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत बजाजनगर ज्युदो क्लबच्या प्रियंका गुप्ता हिने १७ वर्षांखालील ३६ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले. प्रियंका गुप्ता ही अल्फोन्सा हायस्कूल या शाळेत १० वी इयत्तेत शिकत असून, तिला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, शैलेश कावळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल एकनाथ जाधव, बी. बी. जाधव, प्राचार्य अजित जाधव, जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामनोदकर, राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, गुरदीपसिंग संधू, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, विश्वजित भावे, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, गणेश शेटकर, विजय धिमान, भीमाशंकर नावंदे, लक्ष्मीकांत खिची, झिया अन्सारी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Priyanka Chopra in National Judo Tournament