शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचा भाव पाच हजारांवर

By admin | Updated: September 19, 2014 00:27 IST

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला.

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला. हंगाम येताच भाव घसरण्याची परंपरा कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या मालास समाधानकारक दर मिळत नाहीत. बाजारात केवळ १०० क्विंटल तुरीची आवक होती.
हिंगोली जिल्हा पांढऱ्या सोन्याच्या पिकाचा म्हणून ओळखला जातो. कापसात तुरीचे अंतरपीक सर्रास शेतकरी घेतात. शिवाय नगदी पीक म्हणूनही तुरीकडे पाहणारे शेतकरी आहेत. गतवर्षी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली होती. यंदा त्यात घट होऊन २७ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. शेतकऱ्यांनीही तुरीला दूर लोटल्याने २३ हजार हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आले. यंदा केंद्र सरकारने तुरीला ४ हजार ३५० रूपयांचा दर जाहीर केला. त्यातच गुरूवारी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला चांगला भाव मिळाला. सकाळी ४ हजार ४३३ रुपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन ५ हजार ४७ रुपयांपर्यंत कमाल दर गेला.
दरात तेजी आली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच अधिक माल असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकरीवर्गास झाला नाही. (प्रतिनिधी)