टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:29:02+5:302014-07-25T00:28:28+5:30

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे

Prepare for scarcity measures | टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय-योजना राबविण्याची गरज आहे. यादृष्टीने प्रशासनाने काम करावे. अशा सुचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या.
येथील जिल्हा कार्यालयात गुरूवारी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जयस्वाल यांनी विभाग निहाय कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपायुक्त डॉ. अनिल रामोड, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदींची उपस्थिती होती.
मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झालेली आसल्याने प्रशासनाला दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. जिल्हयात आज आहे त्यापेक्षाही बिकट स्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कामे करावीत. ग्रामीण भागात विद्युत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ देता कामा नये. ज्या ग्रामपंचायतींकडे विद्युत बिल थकीत आहे. त्यांचे विद्युत कनेक्शन कट करू नका, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)
काय म्हणाले आयुक्त
ग्रामीण भागात कोठेही पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी़
सर्व विभागांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा़
लोकसहभागतून गाळ काढण्याचे काम हाती घ्या़
पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक पध्दतीत झालेल्या बदलानुसार बियाणे, खत उपलब्ध करुन द्या़
कृषी विभागाने जनजागृतीवर भर द्यावा़
नरेगांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांवरील हजेरी पुस्तकांचा हिशेब प्रलंबित ठेवू नका़
टँकरच्या खेपा व्यवस्थित होतात का याकडे लक्ष द्या़
दहा टँकरमागे एक याप्रमाणे जनावरांसाठी टँकर सुरु करा़

Web Title: Prepare for scarcity measures