शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. सदस्यांनी मासिक सभा उधळली

By admin | Updated: May 22, 2014 00:10 IST

माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला कंटाळत बुधवारी पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभा उधळून लावली.

 माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला कंटाळत बुधवारी पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभा उधळून लावली. पंचायत समिती सदस्य सुशील सोळंके यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. माजलगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी असलेले पांढरे यांनी मनमानी कारभार चालविला आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता. तो आज मासिक सभेच्या निमित्ताने बाहेर पडला. गटविकास अधिकारी पांढरे यांचा इतर अधिकार्‍यांवर वचक राहिला नसल्यामुळे ते कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. दरम्यान कार्यालयात अनेक कामे खोळंबत आहेत. याचा फटका अनेकांना बसतो आहे. बुधवारी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू झाल्यानंतर पंचायत समिती सदस्य सुशील सोळंके यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मासिक बैठकीत घेतलेल्या कोणत्याच ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतस्तरावरील शौचालयाचा निधी पडून असतानाही ग्रामसेवक गावात योजना राबवित नाहीत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची सर्व कामे बंद आहेत. पंचायत समिती कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कार्यालयात कर्मचारी कधी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे यापूर्वी समोर आलेले आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. बैठकीच्या अ‍ॅजेंड्यावर कुठलाही विषय नसतो. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी पंचायत समिती सदस्यांनी केला. या संदर्भात पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिकारी पांढरे यांना जाब विचारला. परंतु त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पंचायत समितीतील भोंगळ कारभाराला गटविकास अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य भास्कर कचरे, जीवन राठोड , मोहनराव घाटुळ, सुदाम आगे, श्रीकृष्ण सोळंके, मधुकर देशमाने, सुशील सोळंके यांनी करत मासिक सभा उधळून लावली. जनतेची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे - सोळंके गटविकास अधिकार्‍यांच्या मानमानी कारभारामुळे विकास कामे रखडली आहेत. तसेच जनतेची कामे करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली. विकास कामे करण्याची इच्छा असतानाही अधिकारी अडसर ठरत आहेत. पांढरे यांची बदली करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचेही पंचायत समिती सदस्य सोळंके यांनी सांगितले. महिला सभापतीचे मौनव्रत पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती या दोन्ही महिला असल्याने त्या अधिकार्‍यांना काहीच बोलत नाहीत. मासिक बैठकीतही सर्व सदस्य गटविकास अधिकार्‍यांना बोलत असताना महिला सभापती व उपसभापती यांनी एकही शब्द काढला नाही. पंचायत समितीच्या सभापती असल्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी अधिकार्‍यांकडून कामे करून घ्यायला हवीत, असे न होता महिला सभापती मौनव्रत बाळगत आहेत. पं.स. सदस्य अधिकार्‍यांना विरोध करत आहेत.(वार्ताहर)