पोलिस पाटलाने तरुणास हातपाय बांधून केली मारहाण

By Admin | Updated: June 13, 2014 00:37 IST2014-06-13T00:19:26+5:302014-06-13T00:37:29+5:30

उमरी : शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरुन सिंधीतांडा येथील पोलिस पाटील व त्याच्या साथीदारांनी शेतकरी तरुणास शेतात हायपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

Police beat up the boy and tied the knot | पोलिस पाटलाने तरुणास हातपाय बांधून केली मारहाण

पोलिस पाटलाने तरुणास हातपाय बांधून केली मारहाण

उमरी : शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरुन सिंधीतांडा येथील पोलिस पाटील व त्याच्या साथीदारांनी शेतकरी तरुणास शेतात हायपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
१२ जून रोजी सकाळी विश्वनाथ पांडुरंग राजरवाड (वय २५ , रा. सिंधी) हा तरुण शेतात दूध काढण्यासाठी गेला. यावेळी आमच्या शेताला जाण्याचा रस्ता का बंद केलास असे म्हणून सहा जणांनी विश्वनाथ यास लाकाडाने व काठ्यांनी बेदम मारहाण केली. या तरुणाच्या डोक्यास व दोन्ही पायास गंभीर दुखापत झाली. उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने त्यास नांदेडला हलविण्यात आले. विश्वनाथ राजरवाड यांच्या फिर्यादीवन संजय जाधव, दिलीप जाधव, मधुकर राठोड, कैलास राठोड, बाबूराव राठोड, गणपती जाधव (पोलिस पाटील) या सहा जणांविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास जमदार बी. एम. जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)
मतदारांचा विमा
लोहा : शहरातील अठरा हजार मतदारांचा ५० हजारांचा विमा पालिका प्रशासनाने काढले असून विम्याची रक्कम युनायटेड इंशुरंस कंपनीकडे भरणा केली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आशाताई चव्हाण यांनी दिली़ विमा रकमेचा २ लाख ७० हजार १८ रुपयांचा धनादेश देण्यात आला़

Web Title: Police beat up the boy and tied the knot