पाईप लाईन ‘लिकेज’; पाणीपुरवठा विस्कळीत

By Admin | Updated: December 8, 2015 00:07 IST2015-12-07T23:41:42+5:302015-12-08T00:07:02+5:30

बीड : शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन दोन दिवसांपूर्वी ‘लिकेज’ झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे सोमवारचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला

Pipe Line 'Likese'; Water supply disrupted | पाईप लाईन ‘लिकेज’; पाणीपुरवठा विस्कळीत

पाईप लाईन ‘लिकेज’; पाणीपुरवठा विस्कळीत


बीड : शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन दोन दिवसांपूर्वी ‘लिकेज’ झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे सोमवारचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून असून, रात्री उशिरापर्यंत ‘लिकेज’ काढण्याचे काम प्रगतीपथावर होते.
बीडपासून १० कि.मी. अंतरावर म्हाळस जवळ्याजवळ ही पाईप लाईन ‘लिकेज’ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एका पुलाच्या ठिकाणी वळण रस्त्याचे काम सुरू आहे. याचवेळी जेसीबीचा धक्का लागल्यामुळे पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटली. ही माहिती पालिकेतील पाणीपुरवठा विभागाला समजताच अधिकाऱ्यांनी धाव घेत माजलगाव धरणातून पाणी बंद केले. त्यानंतर लगेच जोडणीच्या कामाला वेग देण्यात आला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होऊन मंगळवारी सुरळीतपणे शहराला पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ यांनी सांगितले.
पाईप लाईनचे ‘लिकेज’ काढण्यासाठी जेसीबीसह विविध वेल्डींगच्या मशिनरी, दहा कर्मचारी, अधिकारी याठिकाणी तळ ठोकून आहेत. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pipe Line 'Likese'; Water supply disrupted