शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पीआय, पीएसआय स्वीकारतात लाच !

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडाधड कारवाया होत असतानाही पोलिस प्रशासनातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही़

लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडाधड कारवाया होत असतानाही पोलिस प्रशासनातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही़ गेल्या दीड-दोन वर्षात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांसह जवळपास १४ पोलिस लाचप्रकरणात अडकले आहेत़ त्यांच्याकडून सव्वा लाखाच्या आसपास लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे़ ५४ सापळ्यांपैकी ११ सापळ्यांत १४ पोलिस कर्मचारी अडकले़ त्यात एका पोलिस निरीक्षकासह दोघा फौजदारांचा समावेश होता़ लाचखोरीत महसूल कर्मचार्‍यांचा बोलबाला असला तरी आता त्यांच्यापुढे पोलिस कर्मचारी गेले आहेत़ आरोपीला अटक करू नये म्हणून लाच स्वीकारणे, वॉरंट न देण्यासाठी तसेच चार्जशीट आरोपीच्या बाजूने करण्यासाठी, हातकड्या न घालण्यासाठी आणि पोलिस कस्टडीत चांगली वागणूक देण्यासाठी लाच मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या दीड वर्षात एका पोलिस निरिक्षकासह दोघा फौजदारांनी आणि ११ पोलिस कर्मचार्‍यांनी लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले आहे़ देवणी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकास तसेच औराद आणि लातूर ग्रामीणच्या पीएसआयलाही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे़ ट्रॅप केलेल्या १४ पोलिस कर्मचार्‍यांकडून १ लाख २५ हजार रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एऩजी़ अंकुशकर यांनी दिली़ पीआयच्या ट्रॅपमध्ये २५ हजाराची रक्कम होती तर पीएसआयच्या ट्रॅपमध्ये प्रत्येकी १५ हजाराची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे़ २५, २०, १५ हजार रूपयांचा पोलिस अधिकार्‍यांचा भाव आहे तर पोलिस कर्मचारी ९, ५, २, १ हजार रूपयात तडजोड होवून ५०० रूपये लाच स्वीकारल्याच्याही घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ ५४ पैकी १४ कर्मचारी पोलिस दलातील आहे़ ५४ पैकी १४ पोलिस कर्मचारी ट्रॅपमध्ये सापडले़ एकूण सापळ्यापैकी पोलिस कर्मचार्‍यांचे ११ सापळे आहेत़ तर अन्य विभागातील सापळ्यांच्या तुलनेत या विभागाचे लाचेचे प्रमाण २० टक्क्यावर आले आहे़, असेही पोलिस उपाधीक्षक अंकुशकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)