शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

फिजीओथेरपी महाविद्यालय कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून कागदावरच ...

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्ताव मार्गी लागून महाविद्यालयाची प्रत्यक्षात उभारणीची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयाला केंद्र आणि राज्य सरकारकडून फक्त कागदोपत्री प्रकल्पांचा ‘डोस’ दिला जात आहे. अ‍ॅक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी वारंवार प्रस्ताव पाठवण्यात येत होते. परंतु, त्रुटी आणि तांत्रिक कारणांनी हा प्रस्ताव माघारी पाठविण्यात आला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी ठेवण्यात आला. परंतु, पुढे काहीही होत नसल्याची स्थिती आहे.

शासकीय दंत महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागादरम्यान असलेल्या जागेवर ३६ कोटींची पाच मजली इमारत उभारणी प्रस्तावित आहे. अ‍ॅक्युपेशनल थेरपीचे ३० आणि फिजिओथेरपीचे ३० असे एकूण ६० विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेतील.

विलासराव देशमुख यांनी दिली होती तत्वत: मान्यता

माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी २०१० मध्ये भौतिकोपचार (फिजिओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाला तत्वत: मान्यता दिली होती. महाविद्यालयासाठी जागा मंजूर आहे, इमारतही मंजूर आहे. परंतु प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे, असे वरिष्ठ व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. सतीश मसलेकर यांनी सांगितले. प्रस्तावासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.