शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफआय’च्या राज्य अध्यक्षांना अटक, दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

By बापू सोळुंके | Updated: September 23, 2022 19:02 IST

एटीएसचे अधिकारी राज्य अध्यक्षांची चौकशी करीत होते. आज अखेर त्यास अटक करण्यात आली.

औरंगाबाद : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) महाराष्ट्र अध्यक्षांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक करून शुक्रवारी दुपारी ‘एटीएस’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या पाचव्या आरोपीला ९ दिवस, अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शेख नासेर शेख साबेर ऊर्फ नदवी (३७, रा. बायजीपुरा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. नदवी हे ‘पीएफआय’च्या महाराष्ट्र प्रमुख आहे. त्यांच्यासह शहरातील शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (वय ३७) सय्यद फैजल सय्यद खलील (२८), परवेज खान मजम्मील खान (२९) आणि जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रेहमान गंज, जालना) यांना ताब्यात घेतले होते. नदवी व्यतिरिक्त अन्य आरोपींना काल सकाळी अटक केली होती. नदवीची मात्र एटीएसचे अधिकारी चौकशी करीत होते. आज अखेर त्यास अटक करून ‘एटीएस’चे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबे यांनी न्यायालयात हजर केले. 

यावेळी सरकारी वकील विनोद कोटेचा यांनी आरोपींविरोधातही देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांना ‘टेरर फंडिंग’ मिळाली का, याचा तपास करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेणे, त्याचा देशातील देशाबाहेर कोणासोबत संपर्क आला होता, का याविषयी तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. काल अटक केलेल्या संशयितांना १० दिवस, अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींसोबतच नदवीला न्यायालयात हजर करता यावे, यासाठी त्यालाही न्यायालयाने त्यास २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी