तासिका चालू असताना मोबाईल वाजल्यास शिक्षकांना दंड

By Admin | Updated: June 17, 2014 00:51 IST2014-06-17T00:41:54+5:302014-06-17T00:51:56+5:30

भोकर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची नाळ जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडली गेली असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असावेत़ अध्यापनाचे काम

Penalties to teachers when the mobile is running while the phone is running | तासिका चालू असताना मोबाईल वाजल्यास शिक्षकांना दंड

तासिका चालू असताना मोबाईल वाजल्यास शिक्षकांना दंड

भोकर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची नाळ जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडली गेली असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असावेत़ अध्यापनाचे काम चालू असताना गुरूजनांचा मोबाईल वाजल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी येथे केले़
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाश गब्बा राठोड यांनी भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली व विद्यार्थ्यांना पूष्प देवून स्वागत करीत पुस्तकाचे वाटपही केले़
यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर मुख्याध्यापक डी़ बी़ राठोड, सुभाष यशवंतकर, मनोजसिंह चौव्हाण, विठ्ठल फुलारी, संदीप पा़ गौड यांची प्रमुख उपस्थिती होती़
उपाध्यक्ष राठोड म्हणाले, रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा २४ जूनपासून भरण्यात येतील़ शाळेच्या संरक्षण भिंतीसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल़ शैक्षणिक सुविधा देण्यात येणार असले तरी शिक्षकांनी पुढची पिढी घडविण्याचे काम नेटावे करावे़ सूत्रसंचालन विजया घिसेवाड तर टी़ ए़ देशमुख यांनी आभार मानले़ (वार्ताहर)

Web Title: Penalties to teachers when the mobile is running while the phone is running