शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वसाहती निर्माणासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

By admin | Updated: July 30, 2015 00:21 IST

गंगाराम आढाव , जालना जालना येथील राज्य राखीव पोलिस दलातील निजामकालीन वसाहत पाडून नवीन वसाहत बनविण्याचे प्रस्तावित आहे.

गंगाराम आढाव , जालना जालना येथील राज्य राखीव पोलिस दलातील निजामकालीन वसाहत पाडून नवीन वसाहत बनविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे ९४ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव शासनाकडून तात्काळ मंजूर करून घेण्यासंदर्भात स्थानिक आमदार व खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. जालना येथील राज्य राखीव पोलिस बल क्र. ३ ला बिष्णोई यांनी बुधवारी भेट देवून विविध कामांचा आढावा घेतला. बिष्णोई म्हणाले की, जालना येथील या गु्रपचा सर्वात मोठा प्रश्न निवासस्थानांचा आहे. वसाहतीची पाहणी केली असता त्याच्या दुरूस्तीची गरज आहे. निवास स्थाने दुरूस्तीसाठी ७ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावास मंजुुरी मिळालेली आहे. त्याचा निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. तो लवकरच उपलब्ध करण्यासंदर्भात पाठपुरवा सुरू आहे. त्यानंतर काही निवास स्थांनाची त्या निधीतून दुरूस्ती करण्यात येणार आहे. निवास स्थानाचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून या ठिकाणी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सुमारे ९४ कोटीचा हा प्रस्ताव पोलिस महासंचालक हौसिंगकडून मंजूर होऊन तो मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. आमच्याकडून त्याबाबतचा पाठपुरवा सुरू आहे. मात्र मोठ्या रक्कमेचा हा प्रस्ताव असल्याने तसेच हा प्रस्ताव मार्गी लागल्यास जवानांचा निवासस्थानाचा प्रश्न सुटेल. हा प्रस्ताव मंत्रालयातून मंजूर करण्यासंदर्भात येथील स्थानिक लोप्रितिनिधींनीनी लक्ष देवून निधी मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. या गु्रपमधील कर्मचाऱ्यांच्या निजामकालीन असलेल्या निवासस्थांनाची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते परिसरातील विकसित केलेल्या नाना - नानी पार्क, महिलांसाठी वाचनालय व व्यायाम शाळा, नक्षत्र गार्डन, गेट नं २ वर तयार केलेल्या गार्ड रूमचे उद्घाटन करण्यात आले. ४जवानांचा दरबार घेवून त्यांच्या समस्या जाणून घेवून जवानांना मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद गु्रपचे समादेशक निसार तांबाळी, जालन्यातील सहाय्यक समादेशक के.एन. मेटकर, पोलिस निरीक्षक संतोष जोशी, पवार, ढहाके, पुंडलिक खेडकर आदींची उपस्थिती होती.