पाटोद्यात मोर्चेकरी, पोलिसांत जुंपली

By Admin | Updated: August 18, 2015 00:10 IST2015-08-18T00:10:38+5:302015-08-18T00:10:38+5:30

पाटोदा : दुष्काळ जाहीर करावा, हाताला काम द्यावे, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये वादावादी झाली.

Patochalaya Morchkari, the police thugs | पाटोद्यात मोर्चेकरी, पोलिसांत जुंपली

पाटोद्यात मोर्चेकरी, पोलिसांत जुंपली


पाटोदा : दुष्काळ जाहीर करावा, हाताला काम द्यावे, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मोर्चेकरी महिलांनी केला तर मोर्चेकऱ्यांनीच अरेरावी केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
विष्णूपंत घोलप, राजाभाऊ देशमु, महादेव नागरगोजे, जयश्री जावळे, सिंधू घोलप, कल्पना सोनटक्के आदींचा मोर्चात सहभाग होता. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख व इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर काही मोर्चेकरी महिला आक्रमक झाल्या. त्यांना रोखताना पोलिसांनी ढकलाढकली केली. त्यानंतर महिला व पोलिसांमध्ये धरपकड झाली. नंतर उपविभागीय कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या दिला.
याबाबत पाटोदा ठाण्याचे निरीक्षक शिरीष हुंबे म्हणाले, महिला तहसीलदारांच्या दालनास कुलूप लावण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानुसार त्यांना रोखले होते. (वार्ताहर)

Web Title: Patochalaya Morchkari, the police thugs