शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
7
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
8
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
9
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
10
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
11
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
12
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
13
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
15
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
16
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
17
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
18
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
19
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
20
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत घाटीचा कायापालट

By admin | Updated: August 22, 2014 00:21 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले.

बापू सोळुंके, औरंगाबाद
शासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. या हॉस्पिटलची ख्याती ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी याच रुग्णालयास पसंती देत आहेत. परिणामी तेथील खाटा अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने हॉस्पिटलचा दुसरा टप्पा उभारण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
घाटीतील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथावर पडलेले दिसतात. कॅन्सरच्या रुग्णांना अ‍ॅडमिट राहता येईल असे स्वतंत्र शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादेत उभारावे, यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर के ला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदान येथील जागाही मिळवून दिली. हॉस्पिटलसाठी निधी कमी पडू दिला नाही. शिवाय हॉस्पिटलचे काम योग्य होते अथवा नाही, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी बांधकामस्थळी भेटीही दिल्या. कंत्राटदाराने उत्कृष्ट बांधकाम करून हॉस्पिटलची नवीन इमारत घाटीच्या ताब्यात दिली. २१ सप्टेंबर २०१२ रोजी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या आलिशान हॉस्पिटलमध्ये आठ आॅपरेशन थिएटर आहेत. शिवाय महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, पॅथॉलॉजी लॅब आहे. हॉस्पिटल सुरू झाल्याचे कळताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण तेथे दाखल होऊ लागले. तेथील अद्ययावत यंत्रणा केवळ कॅन्सरच्या पेशीच जाळून टाकते. हे करताना चांगल्या पेशीचे नुकसानही होऊ देत नाही. परिणामी किरणोपचारामुळे होणारे साईड इफेक्टस् येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सोसावे लागत नाहीत. शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार येथे उपलब्ध आहेत. कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला प्राधान्य देत आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
मेडिसीन विभागाला कॉर्पोरेट लूक
घाटीत दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्ण हे मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. विषबाधा, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे रुग्ण, सर्पदंश झालेले, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, चिकुन गुनिया, स्वाईन फ्लू अशा विविध साथींचे रुग्ण, टी.बी., एच.आय.व्ही. एड्स, कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज, अशा विविध प्रकारांच्या आजाराचे रुग्ण मेडिसीन विभागात विविध वॉर्डांत अ‍ॅडमिट होतात. जानेवारी २०१३ पूर्वी मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड विखुरलेले होते.
प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांची दमछाक होई. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे घाटी रुग्णालय अभ्यागत समितीचे अध्यक्ष असताना २००८ साली त्यांनी मेडिसीन विभागाचे विखुरलेले वॉर्ड एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडून निधी मिळवून मेडिसीन विभागासाठी सर्व सुविधा असलेली दोन मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली.
जानेवारी २०१३ मध्ये ही इमारत मेडिसीन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. तेव्हापासून मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड, एमआयसीयू, आयसीयू, पॅथॉलॉजी लॅब एकाच छताखाली आणण्यात आले.