शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला जाणारे प्रवासी ताटकळले

By admin | Updated: May 26, 2014 01:17 IST

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

 औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. अचानक बस रद्द झाल्याने प्रवासी आणि स्थानकावरील चालक- वाहक, कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. जवळपास तासाभरानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी एक वाजता शिवनेरी बसने पुण्याला जाण्यासाठी प्रवासी आले होते. बस नादुरुस्त झाल्यामुळे ती रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. अचानकपणे बस कशी रद्द करण्यात आली, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. आजारी व्यक्ती सोबत असून, उपचारासाठी पुण्याला लवक रात लवकर पोहोचायचे आहे; परंतु स्थानकावर आल्यावर बस रद्द झाली असून, तिकिटाचे पैसे परत देण्यात येतील, असे स्थानकातील कर्मचार्‍यांनी प्रवाशांना सांगितले. त्यामुळे प्रवासी आणखी भडकले. त्वरित पर्यायी बसची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. काही वेळ प्रवासी आणि कर्मचार्‍यांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. तात्काळ दुसरी बस सोडण्याची मागणी प्रवाशांनी लावून धरली. अखेर प्रवाशांच्या मागणीसमोर मंडळाने गुडघे टेकले. त्यांनी त्वरित दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुसर्‍या बसची व्यवस्था केली. दुपारी एक वाजता रवाना होणारे प्रवासी दुपारी दोन वाजता औरंगाबादेतून निघाले. मात्र, पुन्हा दुपारी दोन वाजेच्या बसने जाणार्‍या प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी पुढील बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागले. एखादी जादा बस हवी औरंगाबादहून पुण्याला जाणार्‍यांची संख्या बरीच आहे. खाजगी ट्रॅव्हल्सपेक्षा एस. टी. महामंडळाच्या शिवनेरी बसला अनेक नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अचानक बस नादुरुस्त झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी किमान एखादी जादा बस ठेवण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली. नादुरुस्त बस एक बस अचानक नादुरुस्त झाल्यामुळे दुपारी एक वाजेची शिवनेरी बस रद्द करावी लागली. तरीही या प्रवाशांची पुढील वेळेतील बसमध्ये प्रवासाची सुविधा करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) प्रताप जाधव यांनी दिली.