शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पावणेचार दलघमी पाण्याची चोरी

By admin | Updated: August 17, 2014 00:55 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील पाण्याचा उपसा नियंत्रणासाठी दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित असलेल्या साठ्यापैकी ३़७६ दलघमी एवढ्या पाण्याचा सिंचनासाठी अनधिकृतपणे उपसा झाल्याची बाब प्रभारी आयुक्त डॉ़निशिकांत देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर हा उपसा तत्काळ बंद करुन त्यावर नियंत्रणासाठी दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एकमेव स्त्रोत असलेल्या विष्णूपुरी जलाशयातील पाणी हे फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ सद्य:स्थितीत अत्यंत कमी म्हणजे केवळ १७़०९ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ याबाबत शासनाने मागील महिन्यातच सर्व प्रकारच्या शासकीय स्त्रोतातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करुन सर्व प्रकारच्या पाण्याचा उपसा तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते़ विद्यमान आणि संभाव्य टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेता २७ जुलै रोजी दिग्रस बंधाऱ्यातील ८़६८ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्याच्या वापरासाठी विष्णूपुरी जलाशयात सोडण्यात आले होते़ परंतु पिण्यासाठी आरक्षित केलेल्या साठ्यापैकी ३़७६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अनधिकृतपणे सिंचनासाठी उपसा केल्याचे उघडकीस आले़ ही बाब आयुक्तांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निदर्शनास आणून दिली़ त्याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे अभियंता, महावितरण अभियंता यांना एका लेखी पत्राद्वारे विष्णूपुरी जलाशयातील अनधिकृत उपसा रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलून कारवाईच्या सूचना दिल्या़ मनपा आयुक्तांनी दक्षता पथक गठीत करुन अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवावे असेही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)