शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

सुकन्या योजनेकडे पालकांची पाठ !

By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST

सितम सोनवणे ,लातूर शासनाच्या सुकन्या योजनेस लातूर जिल्ह्यातील ८५ लाभार्थी पालकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़ वेगवेगळे प्रमाणपत्र गोळा करावे लागत असल्याने या योजनेकडे लाभार्थी पाठ फिरवत आहेत़

सितम सोनवणे ,लातूरशासनाच्या सुकन्या योजनेस लातूर जिल्ह्यातील ८५ लाभार्थी पालकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़ वेगवेगळे प्रमाणपत्र गोळा करावे लागत असल्याने या योजनेकडे लाभार्थी पाठ फिरवत आहेत़सुकन्या योजनेंतर्गत राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्यात सुधारणा करणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बाल विवाह रोखणे आणि मुलींंचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने योजना सूरु करण्यात आली़ या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे़ योजनेची सुरूवात होऊन सात महिन्याचा कालावधी लोटला आहे़ महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे़ शहर व ग्रामीण असे दोन भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी कुटुंबातील फकत दोन अपत्यांपर्यंत लागू आहे़ मुलींच्या नांवे जन्मत: २१,२०० रुपये एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून मुलीस वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार आहे़ तसेच आम आदमी योजनेंतर्गत मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून १०० रुपयांचा प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन मुलीच्या पालकांचा विमा उतरविला जाईल ज्यात पालकांचा मृत्यू,अपघात अशी परिस्थिती ओढविल्यास ७५ हजार, नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, दोन डोळे अथवा दोन अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ७५ हजार, एक डोळा व एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७,५०० रुपये देण्यात येतात़ आम आदमी विमा योजनेतून लाभार्थी मुलींस ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने इयत्ता नववी ते बारावीमध्ये मुलगी शिकत असताना दिली जाईल़ सर्व निधी राज्य शासनाच्या नावे असणाऱ्या मुलीच्या सरप्लस खात्यात जमा करण्यात येतो़