शेतकरी हितासाठीच कारखाना निवडणुकीत पॅनल : धनंजय मुंडे

By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:18:18+5:302015-04-17T00:43:35+5:30

परळी : स्व. गोपीनाथराव मुंडे व जेष्ठ नेते पंडितराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली

Panel for the sake of farmers' factory: Dhananjay Munde | शेतकरी हितासाठीच कारखाना निवडणुकीत पॅनल : धनंजय मुंडे

शेतकरी हितासाठीच कारखाना निवडणुकीत पॅनल : धनंजय मुंडे


परळी : स्व. गोपीनाथराव मुंडे व जेष्ठ नेते पंडितराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. मात्र, मागील चार वर्षांमध्ये कारखान्यात मनमानी सुरू आहे. शेतकरी हितासाठी आपण पॅनल उभा केल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.
तपोवन (ता. परळी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ तपेश्वर मंदिरात श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सभासद व शेतकऱ्यांसाठी आपण अहोरात्र कष्ट घेणार आहोत. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी नरहरराव निर्मळ हे होते. बन्सी सिरसट, बाबूराव मुंडे, पी. डी. गीते, बाबासाहेब काळे, माऊली गडदे, अजय मुंडे, विष्णू देशमुख, रूस्तूम सलगर, अजित देशमुख, राजेश गीते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Panel for the sake of farmers' factory: Dhananjay Munde