शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

गाळात रुतले तलाव

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत.

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत. या तलावांचा ताबा शासनाने घेतल्याने शहरातील व घाटाखालील शहराच्या शिवेत असलेल्या ११ तलावांत शेकडो वर्षांपासून गाळ साचल्याने तलावातील पाणीसाठा उन्हाळ््यापूर्वीच आटत आहे़ शहरातील पाणीपातळी कमी होत आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याने नगराध्यक्ष राजेंद्र केशवे यांनी पालकमंत्री डी़पी़ सावंत, जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा कृषी अधिकारी संजय पडवळ यांना प्रत्राद्वारे विनंती करून या तलावातील गाळ काढण्याची मागणी केली आहे़ पौराणिक व ऐतिहासिक पुस्तकी उल्लेखाप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माहूर शहराचे अनेकवेळा नामकरणही झाल्याने व येथे अनेक देवदेवता, पीरबाबा, राजे महाराजांनी राज्य केले आहे़ त्या काळात शहर व परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्या निवारणासाठी मोक्याच्या ठिकाणी मालगुजारी तलाव कुंड, जमिनीतील हौद, बारव, विहिरी बांधण्यात आल्या़ ज्या ठिकाणी तलाव बांधले गेले, त्या तलावाखालून झिरपून जाणार्‍या पाण्याच्या स्त्रोतावर विहिरी केल्यामुुळे शहरात पाणीटंचाई जाणवत नव्हती़ जसजसे तलावात गाळ साचत गेला तसे शहरातील विहिरीही आटत गेल्या़ परिणामी शहरात गेल्या दहा वर्षांपासून नळयोजना असूनही पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढीव वस्त्या तयार झाल्याने पाण्याची गरज वाढू लागली़ त्यामुळे नागरिकांनी कुपनलिका खोदण्याचा सपाटा लावला़ त्यामुळे अस्तित्वात असलेल्या नळयोजना कुचकामी ठरल्या व कुपनलिकांमधील पाणी उपशाने जमिनीतील पाणी खालावले आहे़ अक्काला तलाव हे श्रीदत्त शिखर संस्थानच्या मालकी क्षेत्रात असल्याने व पूर्णपणे गाळपल्या गेल्याने तेथे शेती करण्यात येते. हा तलाव उपसून त्यात पाणी साठवल्यास शहरातील संपूर्ण विहिरी कुंड कुपनलिकांना भरमसाठ पाणी वर्षभर राहते अशी माहिती सत्तरी ओलांडलेले नागरिक देतात़ याशिवाय शहरात (भोजंती फुलतळे) असून तेही पूर्णपणे गाळपल्या गेले आहे़ याशिवाय शहरातील श्री जगदंबा हायस्कूल जवळील भानुतीर्थ कुंड स्वच्छ करण्याची गरज असून त्याद्वारे शहरातील कुपनलिका व विहिरींना जमिनीतील स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा होतो़ शहराला लागून घाटाखाली पूर्व बाजूस खंड्याखोरी तलाव, उत्तर बाजूस पांडवलेणी तलाव, उत्तर पश्चिम बाजूस सोनापीर बाबा तलाव, दक्षिण बाजूस गुंडवळ तलाव असून हे तलाव पूर्णपणे गाळपले आहेत़ याशिवाय रेणुकादेवी, श्री दत्त शिखर व कैलास टेकडीच्या मध्ये रामगढ किल्ल्यात अतिपवित्र समजले जाणारे र्इंजाळा तलाव हे भुसभुशीत पहाडाच्या मध्ये अतीउंच ठिकाणावर असल्याने तेही गाळपले आहेत. जंगली श्वापद भाविक पर्यटकांचे आकर्षण असलेले हे तलावही गाळपले असल्याने येथे कावडीद्वारे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. शहरास पर्यटन केंद्रांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तलावातील गाळ काढणे अत्यावश्यक आहे़शहरातील मोहाळा मातृतीर्थ तलावास पौराणिक महत्त्व असल्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तरतूद करण्यात आली. जागमाता तलाव गाळाने पूर्ण भरले असून नागरिक या तलावाचा उपयोग कपडे धुण्यासाठी करत आहेत़ पर्यटन केंद्रास लागून असलेला बाळसमुद्र तलावही मालकी क्षेत्रात असल्याने पूर्णपणे गाळपल्या गेला आहे़