शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली.

उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली. सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोला कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आले होते. सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असली तरी ९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले अले तरी आजवर केवळ ५३ सोलापंपच कार्यान्वित होवू शकले. जवळपास वर्षभराचा कालावधी लोटत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत. असे असतानाही २५ टक्यांच्या आसपासच सोलारपंप कार्यान्वित होवू शकल्याने ‘महावितरण’च्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येवू लागले आहे.मागील तीन-चार वर्षात जिल्हाभरातील शेकऱ्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय अक्षरश: मोडून पडला होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने अनुदानावर सोलार कृषीपंप वाटप योजना सुरू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांची भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोलारपंप पाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार वीज कंपनीकडे सुमारे चारशेच्या आसपास अर्जही दाखल झाले. यापैकी सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या १९० शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली. यापैकी १६५ जणांना कोटेशनही देण्यात आले असता ९९ जणांनी पैसे भरले. परंतु, वर्षभराचा कालावधी लोटत आला असतानाही आजवर केवळ ५३ सोलारपंपच कार्यान्वित केले आहेत. पैसे भरूनही ज्या लाभार्थ्यांचे सोलारपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, असे शेतकरी वीज कपंनीकडे चकरा मारीत आहेत. परंतु, अधिकारी सोयीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या प्रकल्पांसह विहिरी, कुपनलिकांना पाणी आहे. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलारपंप मोठा आधार ठरले असते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. पैसे भरूनही संबंधित ज्या लाभार्थ्यांचे सोलार कृषीपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)