शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांची आकडेवारी चुकीची

By admin | Updated: July 9, 2015 00:19 IST

बीड : तुकड्या, शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी, हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अनुदान लाटण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा पुढे येऊ दिला जात नाही

बीड : तुकड्या, शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी, हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अनुदान लाटण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा पुढे येऊ दिला जात नाही. कालच्या सर्वेक्षणातही हेच घडले. त्यामुळे जिल्ह्यात ८० हजार तर राज्यात १० लाख मुले सर्वेक्षणापासून दूर राहिल्याचा आरोप शाळाबाह्य मुलांसाठीच्या कृती गटाचे सदस्य दीपक नागरगोजे यांनी केला.बुधवारी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कृती गटाने सुचविलेल्या शिफारशी देखील डावलल्याचा घणाघात केला. कृती गटाने नमूद केलेले मुद्दे ऐनवेळी प्रपत्रात घेतले नाहीत. त्यामुळे बीडमध्ये केवळ १३१२ तर राज्यात ५१ हजार शाळाबाह्य मुलांचा समोर आलेला आकडा विश्वसनीय नाही, असे ते म्हणाले.६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या दरम्यान करायचे होते. मात्र, सर्वेक्षणातील अधिकारी, कर्मचारी १२ तास कर्तव्यावर नव्हते, असा दावाही त्यांनी केला. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेले सर्वेक्षण संशयास्पद असून त्रयस्थांमार्फत ते झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या लाखो उसतोड मजुरांच्या पाल्यांची संख्या ८० हजारांहून अधिक आहे. मात्र, केवळ १३१२ शाळाबाह्य मुले असल्याचा जावईशोध सर्वेक्षणातून समोर आला. स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांची नोंद सर्वेक्षणात व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. आता केलेले सर्वेक्षण रद्द करून नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)