शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादकरांची थांबली वणवण !

By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST

उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये

उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये, असे वाटल्यावाचून राहत नाही. मात्र शहरामध्ये उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आणि टंचाईचा काळोख दूर झाला. २० ते २५ दिवसाला मिळणारे पाणी आज चार दिवसाआड मिळू लागले आहे. हातलादेवीच्या पायथ्याशी नव्याने पंपहाऊस उभारण्यात येणार आहे. सदरील यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर उस्मानाबादकरांना दररोज मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सदरील यंत्रणा अवघ्या येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल, असे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरामध्ये २०१२-१३ यावर्षातील उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. शहराच्या आजूबाजूचे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. पालिकेच्या कुपनलिकांनीही दम तोडला होता. त्यामुळे शहरामध्ये पाण्याचे संकट अधिकच गंभीर बनले होते. शहरामध्ये तब्बल २० ते २२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत होता. तोही अत्यल्प. खाजगी टँकरचे दरही गगनाला भिडले होते. ५०० लिटर पाण्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागत होते. येथेही वेटींग असे. ही समस्या लक्षात घेवून नगर परिषदेने उजनी पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासाठी तातडीने प्रयत्न करुन शासनाकडे निधीची मागणी केली होती. तत्कालीन आघाडी शासनाने सढळ हाताने निधी दिला. आणि योजनेचे कामही युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे शहराची भीषण पाणी टंचाईच्या जोखडातून मुक्तता झाली. आजघडीला उस्मानाबादच्या जवळपास सर्वच भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. उजनी धरणातून प्रत्येक दिवशी ४० ते ५० लाख लिटर पाणी उचलले जात आहे.दरम्यान, शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हातलादेवीच्या पायथ्याशी कायमस्वरुपी संपहाऊस उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंपाची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ टीएमसी पाणी उचलता येणार आहे. त्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे सांगण्यात येते. नगर परिषदेकडून संपहाऊस बांधकामासाठीची निविदा मागील काही दिवसापूर्वी काढण्यात आली असून, हे काम येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकंदरीतच उजनी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर झाल्यामुळे आज उस्मानाबाद शहर १९ एप्रिल २०१३ रोजी टँकरमुक्त झाले. तेव्हापासून ते आजतागायत पालिका प्रशासनावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. यामुळे कोट्यवधीचा खर्चही वाचला असल्याचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)