दहावीतही मुलींनीच मारली बाजी

By Admin | Updated: June 18, 2014 01:38 IST2014-06-18T01:33:38+5:302014-06-18T01:38:39+5:30

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

Only 10% girls got killed | दहावीतही मुलींनीच मारली बाजी

दहावीतही मुलींनीच मारली बाजी

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७७ टक्के असून, मुलांचे ८५.१२ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४.६५ टक्क्यांनी अधिक आहे.
औरंगाबाद विभागातून नियमित ८५ हजार ६६५ मुले व ६१ हजार ४८५ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या.
त्यातील ७२ हजार ९१६ मुले व ५५ हजार १९७ मुली उत्तीर्ण झाल्या. विभागातून १२ हजार १२० मुले व ४ हजार ४५५ मुली पुनर्परीक्षार्थी होत्या. येथेही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.९७ टक्क्यांनी अधिक आहे.
मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण
जिल्हाउत्तीर्ण मुलीटक्केवारी
औरंगाबाद २०,८८९ ९१.०२
बीड १३,३१७ ९३.६२
परभणी ७,७९४ ८३.१०
जालना८,६१० ९०.८६
हिंगोली ४,५८७ ८४.०९
एकूण५५,१९७८९.७७
मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण
जिल्हाउत्तीर्ण मुलेटक्केवारी
औरंगाबाद २६,२९५८५.९८
बीड१९,३४३ ९०.७१
परभणी१०,२७०७६.४१
जालना११,२५१८६.६९
हिंगोली५,७५७७८.४१
एकूण७२,९१६८५.१२

Web Title: Only 10% girls got killed