कांदा बियाणाला विक्रमी भाव

By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:18:44+5:302014-07-21T00:24:38+5:30

अकोला देव : गेल्या दोन तीन वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी बिगरमोसमी पाऊस. त्यातच पुन्हा गारपीट या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना म्हणावे तसे सीडस्चे कांदा बियाणे घेता आले नाहीत.

Onion seed is a record high | कांदा बियाणाला विक्रमी भाव

कांदा बियाणाला विक्रमी भाव

अकोला देव : गेल्या दोन तीन वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी बिगरमोसमी पाऊस. त्यातच पुन्हा गारपीट या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना म्हणावे तसे सीडस्चे कांदा बियाणे घेता आले नाहीत. कधी नव्हे, ते यंदा मात्र कांदा बियाणाला हजारोवरुन लाखोंचा भाव मिळत आहे.
कांदा बियाणे खरेदीसाठी कंपनीचे अधिकारी व व्यापारी शेतकऱ्यांच्या दारोदारी फिरताना दिसत आहेत. तरीसुद्धा बियाणे मिळणे जिकिरीचे झाले आहे. मागच्या वर्षी पाऊस चांगला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिडस् कांदा बियाणे घेतले. फुलोरा भरण्याच्या काळात सतत धुके, अवकाळी पाऊस, मधमाशांअभावी कांदा बियाणांचे परागीकरण होऊ शकले नाही.
त्यातच पुन्हा गारपिटीच्या तडाख्यामुळे हे बियाणे जमीनदोस्त झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यामुळेच या बियाणांचा सर्वत्र तुटवडा भासत असल्याने कधी नव्हे, दोन लाख रुपये एवढा कांदा बियाणाला भाव आला आहे, अशी माहिती कांदा बीजोउत्पादक शेतकरी कैलास घोडसे यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सीडस कांदा बियाणे लागवड केली. त्यांना थोडाफार का होईना भाव मिळत असल्याचे कृषी अधिकारी पी.एस. बरधे म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Onion seed is a record high