शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 19:00 IST

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा उपक्रम

ठळक मुद्दे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

औरंगाबाद : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या नागरिकांच्या पाल्यांच्या शाळा येत्या आठ दिवसांत उघडल्या जातील. तेव्हा या बालकांना शाळेत जाण्यासाठी वही, पेन, पुस्तक, कंपास आदी शालेय साहित्य असणार नाही. या तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत येताच हे साहित्य मिळावे, यासाठी औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी एक अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. ‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’ उपक्रमांतर्गत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य आणून मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यात राज्यातील नागरिक, शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत जनजीवन सुरळीत होईल. गावांमधील शाळा उघडल्या जातील. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरे आठ दिवसांपासून पाण्यात होती. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू नष्ट झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पावसाने हिरावून घेतले आहे. अगोदरच या भागातील नागरिकांचे जीवन जगण्याचे वांधे झालेले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे कठीण आहे. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याविषयी मदत करण्यात येत नाही. त्यामुळे आपल्या  भावा-बहिणींसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वही, एक पुस्तक, कंपास साहित्य आणावे. हे साहित्य पुरात शालेय साहित्य वाहून गेलेल्या आपल्या बहीण, भावांसाठी पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणलेले शालेय साहित्य मुख्याध्यापकांनी एकत्र जमा करून घ्यावे, हे जमलेले साहित्य वस्तूनुसार वेगवेगळे करून माध्यमिक शिक्षणाधिकारी, चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड येथे आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून जमा झालेले हे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून ते साहित्य प्रत्येक शाळेत पाठविले जाईल, असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून नावलौकिकजि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे नियमितपणे विविध उपक्रम राबवत असतात. दहावी-बारावी परीक्षेच्या काळात विविध केंद्रांना भेटी देऊन त्यांनी कॉपी रोखण्यावर भर दिला होता. ४यात मोठ्या कारवाईसुद्धा केल्या आहेत. यावर्षी शाळा भरताच त्यांनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांची बैठक घेत कॉपीमुक्तीसाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत.४ तसेच प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांना मदत करणे, उपक्रम राबविण्यातही त्यांचा नावलौकिक आहे. यावेळी त्यांनी सामाजिक भान जपत पूरग्रस्तांसाठी साहित्य जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत सर्वजण नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला आहे. यात समाजातील घटकही सहभागी झाल्यास त्यांचेही स्वागतच करूत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांना आपल्या भावा-बहिणींसाठी एक वही, एक पुस्तक घेऊन येतील असा विश्वास आहे.- डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद 

टॅग्स :floodपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकStudentविद्यार्थी