शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे एक ना धड भाराभर चिंध्या

By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST

नांदेड : महानगरपालिकेकडून मोठा गाजावाजा करुन मोहिमा सुरु करण्यात येतात, परंतु मध्येच न समजण्यासारख्या कारणामुळे त्या बंदही पडतात़ आता पुन्हा एकदा मनपाला शहरातील

नांदेड : महानगरपालिकेकडून मोठा गाजावाजा करुन मोहिमा सुरु करण्यात येतात, परंतु मध्येच न समजण्यासारख्या कारणामुळे त्या बंदही पडतात़ आता पुन्हा एकदा मनपाला शहरातील अनधिकृत बांधकामाची आठवण झाली असून मंगळवारपासून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे़ त्यामुळे एक ना धड भाराभर चिंद्या अशी या मोहिमांची अवस्था झाली आहे़ शहरात मनपाकडून यापूर्वीही अनधिकृत बांधकाम, अनधिकृत नळजोडणी, मोबाईल टॉवर, अतिक्रमण, करवसुली अशा विविध मोहिमा राबविण्यात आल्या़ मोहिमांची सुरुवात मोठी गाजावाजा करीत होत असताना, मध्येच या मोहिमा थांबविण्यात येतात़ त्यामुळे पहिल्या टप्प्यात जोर असलेल्या या मोहिमांची अखेरच्या टप्प्यापर्यंत हवा गुल होते़ त्यामुळे नांदेडकरांनाही या मोहिमांबद्दल विशेष आकर्षण राहिले नाही़ एकट्या डॉक्टरलेन भागात पार्कींगच्या जागेसाठी मनपाकडून गेल्या तीन ते चार वर्षांत डेडलाईन या शब्दाचा कितीतरी वेळा वापर करण्यात आला़ त्यामुळे एखाद्या मोहिमांची डेडलाईन नेमकी कोणती ठरवायची? असा प्रश्नही नांदेडकरांना पडत आहे़ पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाची मनपाला आठवण झाली आहे़ त्यासाठी २७ मे पासून विशेष मोहीम सुरु केली आहे़ विविध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची तपासणी करुन ती बांधकामे थांबविणे किंवा पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे़ या पथकात सहाय्यक आयुक्त, नियंत्रक आणि महापालिकेचे पोलिस पथक राहणार आहे़ हे पथक क्षेत्रिय कार्यालय क्रमांक १ ते ६ दरम्यान शिवाजीनगर, अशोकनगर, इतवारा, वजिराबाद, भाग्यनगर, तरोडा बु़ आणि खु़, विमानतळ परिसर, सिडको, हडको, कौठा आदी परिसरात सुरु असलेल्या बांधकामाची तपासणी करुन यापूर्वी पूर्वसूचना दिल्यानंतरही नव्याने सुरु असलेले अनधिकृत व मंजूर नकाशाविरुद्धचे बांधकाम तत्काळ थांबवून पाडण्याची कारवाई केली जाणार आहे़ तर दुसरीकडे मनपाची नालेसफाईची मोहीमही तीन दिवसांपासून सुरु आहे़ मनपाने नव्याने सुरु केलेली ही मोहीम तरी, अखेरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)