आॅटोरिक्षा उलटून एकजण ठार

By Admin | Updated: May 26, 2014 00:57 IST2014-05-26T00:41:17+5:302014-05-26T00:57:08+5:30

औंढा नागनाथ : भरधाव वेगाने जाणारा आॅटोरिक्षा उलटून एकजण गंभीररित्या जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला तर अन्य तिघे जखमी झाले.

One killed the autorickshaw | आॅटोरिक्षा उलटून एकजण ठार

आॅटोरिक्षा उलटून एकजण ठार

औंढा नागनाथ : भरधाव वेगाने जाणारा आॅटोरिक्षा उलटून एकजण गंभीररित्या जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला तर अन्य तिघे जखमी झाले. ही घटना हिंगोली- औंढा मार्गावरील सुरेगाव पाटीजवळ २५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. येहळेगाव सोळंके येथील जगन्नाथ मंचकराव सोळंके (वय २४) हे घरावर टाकण्यासाठी लागणारी पत्रे आणण्यासाठी मित्रांसोबत औंढा येथे गेले होते. पत्रे घेवून आॅटोरिक्षा क्र. एमएच २२- यु.ओ.- ५६३ मधून गावाकडे परत जात असताना सुरेगाव पाटीजवळील राजनंदिनी हॉटेल समोरील वळण रस्त्यावर सदरील वाहन उलटले. या अपघातात जगन्नाथ सोळंके यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले. सोळंके यांना तातडीने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी वैैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश वाकळे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. मयत जगन्नाथ सोळंके हा विशाखापट्टनम येथे सीआयएसएफ (सेंट्रल इन्डस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स) मध्ये नोकरीला होता. तसेच १९ मे रोजी त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर सध्या तो सुट्टीवर असल्याने गावाकडेच राहत होता. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. परंतु अपघातप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: One killed the autorickshaw