रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 17, 2016 23:15 IST2016-02-17T23:09:54+5:302016-02-17T23:15:08+5:30

परभणी : आनंदनगर येथे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली सापडल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८़३० च्या सुमारास घडली़

One killed after falling under the train | रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

परभणी : आनंदनगर येथे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली सापडल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८़३० च्या सुमारास घडली़ याप्रकरणी रेल्वे पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणी स्थानकावर बुधवारी सकाळी ८़३० च्या सुमारास (क्रमांक ५७५४८) पूर्णा -हैदराबाद पॅसेंजर रेल्वे येत होती़ त्यावेळी आनंदनगर रेल्वे पटरीजवळ अंदाजे २७ वर्षीय युवक रेल्वेखाली सापडला़ रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचे डोके शरीरावेगळे झाले़ गार्ड सूर्यकांत जगताप यांनी रेल्वे पोलिसांना माहिती कळविली़ मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नाही़ रेल्वे पोलिसांनी शव जिल्हा रुग्णालयातील शीतगृह पाठविले़ तपास मोहम्मद शफीयोद्दीन शेख, पंकज डिघोळे, दीपक वटाणे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: One killed after falling under the train